दिल्ली सरकारच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय चौकशीला परवानगी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी, दिल्ली सरकारच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात २२३ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय चौकशीला  परवानगी दिली आहे. हे दोन्ही अधिकारी वनं आणि वन्यजीव विभागात कार्यरत होते. या अधिकाऱ्यांनी बनावट पत्राच्या आधारे वनं आणि वन्यजीव विभागाच्या खात्यातून २२३ कोटी रुपये बनावट बचत खात्यात हस्तांतरित केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सक्सेना यांनी भ्रष्टाचार  प्रतिबंधक सुधारणा कायद्या अंतर्गत त्यांच्या विरोधात सीबीआय चौकशीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.