भारतात कार्यरत देशांतर्गत आणि परदेशी बँकांसाठी लाभांशाची रक्कम देण्यासंदर्भातल्या नव्या नियमावलीचा मसुदा प्रकाशित

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) स्थानिक आणि भारतात कार्यरत असलेल्या परदेशी बँकांना लाभांशाची रक्कम देण्यासंदर्भातल्या नव्या नियमावलीचा मसुदा भारतीय रिझर्व्ह बँकेनं मंगळवारी प्रकाशित केला. बदलतं आर्थिक जग आणि जागतिक मानकं लक्षात घेऊन तयार करण्यात आलेली ही प्रस्तावित नियमावली आर्थिक वर्ष २०२४-२५ पासून लागू होणार आहे.

या नियमावलीवर नागरिकांना आपली मतं ३१ जानेवारीपर्यंत देता येणार आहेत आणि एप्रिल २०२४ पासून या परिपत्रकाची अंमलबजावणी होणार आहे.या प्रस्तावानुसार, ज्या बँकांच्या निव्वळ अनुत्पादित मालमत्तेचं प्रमाण ६ टक्क्यांपेक्षा जास्त आणि भांडवली पर्याप्तता गुणोत्तर साडेअकरा टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्या बँकांना लाभांश जाहीर करता येणार नाहीत.