चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन १७ लाख कोटी रुपयांहून जास्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन १७ लाख कोटी रुपयांहून जास्त झालं आहे.गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या कर संकलनाहून हे १७ टक्केने जास्त आहे.हे संकलन २०२३-२४ या वर्षासाठीच्या एकूण अर्थसंकल्पीय निधीच्या ऐंशी टक्के आहे,असं अर्थमंत्रालयानं म्हटलंआहे. कॉर्पोरेट आयकराचा वृद्धीदर ८ पूर्णांक ३२ शतांश टक्के तर व्यक्तिगत आयकराचा वृद्धीदर २६ टक्क्यांहून अधिक आहे.यावर्षी आतापर्यंत २ लाख ४८ हजार कोटी रुपये परताव्यापोटी दिले गेले आहेत.