राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी निकालाची प्रतिक्षा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता याचिकांवर आज निकाल दिला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सायंकाळी साडेचार वाजता विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात निकाल वाचन करणार आहेत. साक्षनोंदणी, उलटतपासणी आणि अंतिम युक्तिवादानंतर ३१ जानेवारी रोजी ही सुनावणी पूर्ण झाली. केंद्रीय निवडणूक आयोगानं अलिकडेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल देत, पक्षाचं नाव आणि चिन्हं अजित पवार गटाला दिलं आहे.