अंदमान-निकोबार बेटांवर काल १३९ नवीन कोविड रुग्ण सापडले
August 13, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंदमान आणि निकोबार बेटांवर काल १३९ नवीन कोविड रुग्ण सापडले असून ४० रुग्ण काल बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत सापडलेल्या एकूण १७६४ कोविड-१९ रुग्णांपैकी ७४९ रुग्ण बरे झाले असून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ९९४ इतकी झाली आहे.

आत्तापर्यंत २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बहुतेक रुग्ण पोर्ट ब्लेअर सह दक्षिण अंदमान जिल्ह्यातील आहेत.