अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
August 19, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाच्या तपासात महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यक्षेत्राला मर्यादा असल्याचं सांगत, या प्रकरणाचे सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवावेत, तसंच तपास कार्यात सीबीआयला सहकार्य करावं, असे निर्देशही न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.

या प्रकरणी यापुढं आणखी काही गुन्हे दाखल झाले तर त्यांचा तपासही सीबीआयनंच करावा, असं न्यायालयानं नमूद केलं आहे. या संदर्भात बिहार पोलिसांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात दाखल केलेला एफआयआर तसंच तो सीबीआयकडे वर्ग करण्याची शिफारस कायदेशीर असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे.