अमित शाह यांना दिल्लीतल्या एम्स रूग्णालयात दाखल
August 18, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आज नवी दिल्लीतल्या एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत दाखल केलं आहे. शाह यांना थकवा आणि अंगदुखीचा त्रास होत होता.

दरम्यान त्यांच्या कोविड19 च्या परीक्षणात कोविडचा संसर्ग आढळला नसल्याचं रूग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले