अयोध्याचे राम मंदिर भूमीपूजनासाठी सज्ज
July 28, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्या, राम मंदिराच्या ५ ऑगस्टला होणाऱ्या भूमीपूजनासाठी सज्ज होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, भूमीपूजन होणार आहे. अयोध्येतल्या विकासकामांचं उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत.

भूमीपूजनाच्या समारंभासाठी, शहराचं सुशोभीकरण केलं जात असून, रस्त्यांवर कमानी उभारल्या जात आहेत. भिंतींवर चित्रं रेखाटली जात असून, या चित्रांमधून रामकथा उलगडेल,असं अयोध्येचे आयुक्त ऋषीकेश उपाध्याय यांनी आकाशवाणीला सांगितलं.