अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी केंद्र सरकारनं घोषित केलेल्या पॅकेजचे कोणतेही परिणाम दिसत नसल्याची शरद पवार यांची टीका
July 25, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड काळात देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी केंद्र सरकारनं घोषित केलेल्या पॅकेजचे कोणतेही दृश्य परिणाम दिसून आलेले नाहीत, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

ते आज औरंगाबादमध्ये कोविड स्थितीचा आढावा घेतल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते. १९९३ साली आलेल्या किल्लारी भुंकपाच्या संकटापेक्षा कोरोनाचं संकट फार मोठं आहे, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे या स्थितीचा योग्य प्रकारे मुकाबला करत असून प्रचंड मेहनत घेत आहेत, असं सांगत पवार यांनी मुख्यमंत्र्यांची प्रशंसा केली.

मुख्यमंत्री घरून काम करत असल्याबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितनं, की मुख्यमंत्री जर सगळीकडे जात राहिले तर स्थितीवर नियंत्रण मिळवणं अवघड जाईल. सरकार सध्याच्या महामारीच्या काळात चांगलं काम करत आहे, असं ते म्हणाले. 

औरंगाबादमधल्या संसर्गाचा दर २६ टक्क्यांवरून १० टक्क्यावर आला असल्याची माहिती यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.