आंतरराष्ट्रीय वाणिज्यिक विमानउड्डाणांवरची बंदी ३० सप्टेंबरपर्यंत कायम
August 31, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी विमानवाहतूक महासंचालनालयानं आंतरराष्ट्रीय वाणिज्यिक विमानउड्डानावरची बंदी ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. आज जारी केलेल्या एका परिपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

तथापि ज्या मालवाहातूक करणाऱ्या विमानांना विशेष परवानगी देण्यात आली आहे त्यांच्या उड्डाणांवर बंदी नसेल असही डीजीसीए नं स्पष्ट केलं आहे. परवानगी दिलेल्या काही निवडक मार्गांवरची वाहतूक सुरू राहिल.