आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीचा कार्यकारी अध्यक्ष्यांवर ७०५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप
July 3, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जीव्हीके गृपचे अध्यक्ष वेंकट कृष्ण रेड्डी तसंच मुलगा आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीचा कार्यकारी अध्यक्ष जीव्ही. संजय रेड्डी याच्यावर केंद्रीय अन्वेषण संस्था अर्थात सी बी आयनं ७०५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल केला आहे.

जीव्ही के गृप आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या कंपन्यांनी मिळून बोगस कंत्राटामार्फत ३१० कोटी रुपयांचा तसंच एम आय एम एल कंपनीच्या पैशाचा जीव्ही के गृप कंपन्यासाठी गैरवापर केल्याचा या दोघांवर आरोप आहे. त्यांच्यासोबत विमानतळ प्राधिकरण्याच्या काही अधिकाऱ्यांवरही सीबी आयनं गुन्हा दाखल केला आहे.