आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत मधमाशी पालनासाठी निधी मंजूर
August 8, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशानं सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत, त्यामध्ये मधमाशी पालनालाही प्रोत्साहन दिलं जात आहे. त्यानुसार आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत मधमाशी पालनासाठी 5 शे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधीनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.

मध उत्पादनात भारत जगातील पहिल्या पाच देशांमध्ये आहे. सन 2005-06 च्या तुलनेत देशातील मध उत्पादनात 242 टक्क्यांनी तर मधाच्या निर्यातीत 265 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज आकाशवाणीशी बोलताना दिली.

मधाच्या निर्यातीत होणारी ही वाढ पाहता सन 2024 पर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यात मधमाशी पालन हा महत्त्वाचा घटक ठरेल, असंही तोमर यांनी नमूद केलं. सरकारतर्फे शेतकऱ्यांना मधमाशी पालनाचं प्रशिक्षण देखील दिलं जात आहे.