आनंद महिन्द्र आणि ऍडोबचे अध्यक्ष यांना अमेरिकेच्या उद्योजक गटाचा पुरस्कार
August 23, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणाऱ्या अमेरिकास्थित उद्योजक गटानं महिन्द्र उद्योगाचे अध्यक्ष आनंद महिन्द्र आणि ऍडोबचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण यांच्या नावाची घोषणा २०२० च्या नेतृत्व पुरस्कारासाठी केली आहे. अमेरिका आणि भारतात द्विपक्षीय संबंधांना चालना मिळण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून ही निवड केली आहे.

‘नवीन आव्हानांचा सामना, भारत-अमेरिका सप्ताह’ या शीर्षकांतर्गत येत्या ३१ ऑगस्टपासून होणाऱ्या तिसऱ्या आभासी वार्षिक परिषदेत हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या परिषदेत दोन्ही देशातले पाचशेहुन अधिक मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.