आपत्कालीन कर्ज हमी योजने अंतर्गत 1 लाख कोटी रुपयांहून अधिकची कर्जे वितरीत
August 20, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्‍ली : 100% आपत्कालीन कर्ज हमी योजना (ECLGS) या भारत सरकारचे पाठबळ असलेल्या योजने अंतर्गत सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांनी 18 ऑगस्ट 2020 पर्यंत 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जे मंजूर केली आहेत. यापैकी 1 लाख कोटींची कर्जे याआधीच वितरित झाली आहेत. ECLGS म्हणजेच आपत्कालीन कर्ज हमी योजना ही आत्मनिर्भर भारत योजनेचा भाग म्हणून सरकारने घोषित केली होती. covid-19 लॉकडाऊनमुळे होणारी प्रचंड हानी आटोक्यात आणण्यासाठी विविध क्षेत्राला खास करून लघु, सूक्ष्म व मध्यम क्षेत्रातील उद्योगांंना कर्ज पुरवणे अशी ही योजना आहे. 

सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातल्या बँकांनी मंजूर केलेल्या संपूर्ण कर्जांचे तपशील खालीलप्रमाणे:

आपत्कालीन कर्ज हमी योजने अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी (PSBs) 76,044.44 कोटीं रुपयांची कर्जे मंजूर केली. त्यापैकी 56,483.41 कोटी रुपयांची कर्जे याआधीच वितरित झाली आहेत. तर खाजगी क्षेत्रातील बँकांनी 74,715.02 कोटी रुपयांची कर्जे मंजूर केली, त्यापैकी 45,762.36 कोटी रुपयांची कर्जे याआधीच वितरित झाली आहेत.‌

कर्ज देणाऱ्या आघाडीच्या बँका म्हणजे भारतीय स्टेट बँक(SBI), कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँक या होत.

सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँकांनी मंजूर आणि वितरित केलेल्या कर्जाचा तपशील खालीलप्रमाणे:

आपत्कालिन कर्ज हमी योजने अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मंजूर आणि वितरित केलेल्या कर्जांचा राज्य निहाय तपशील खालीलप्रमाणे: