आयपीएल साठी विवो कंपनी बरोबर असलेला करार रद्द
August 7, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आगामी आयपीएल साठी चिनी मोबाईल कंपनी विवो बरोबर असलेलं प्रायोजकत्व वाचा करार रद्द केला आहे. यावर्षी आयपीएल साठी विवो कंपनीचे प्रायोजकत्व नसेल असं मंडळानं स्पष्ट केला आहे.

२०१८ ते २०२२ या पाच वर्षांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा विवो कंपनीबरोबर २ हजार १९० कोटी रुपयांचा करार झाला होता. यंदा कोरोना महामारी मुळे आयपीएलचे सामने संयुक्त अरब अमिराती मध्ये येत्या सप्टेंबर पासून सुरू होणार आहेत.