आरक्षणासाठी धनगर समाजाचाही आक्रमक पवित्रा
September 28, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक होत असताना आता धनगर समाजानेही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. धनगर आरक्षणाबाबत त्वरित अध्यादेश काढण्यात यावा या मागणीसह इतर मागण्यांसाठी धनगर समाजानं आज राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे.

पुणे इथंही आज जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं. मराठा समाजासाठी असलेल्या सारथी संस्थेप्रमाणे महाज्योती संस्थेसाठीही निधी उपलब्ध व्हावा, मेंढपाळांवरील हल्ले त्वरित थांबवावे, या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.