आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आईचं काल मुंबईत दीर्घ आजारानं निधन
August 2, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई (वृत्तसंस्था) : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदा टोपे यांचं काल मुंबईत  दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ७४ वर्षांच्या होत्या.

गेला महिनाभर त्या बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार घेत होत्या. शारदा टोपे कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या अध्यक्ष होत्या. 

जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या मूळ गावी आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असून, कोरोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी लागू करण्यात आलेल्या नियमावलीचं यावेळी पालन केलं जाईल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.