इंधन दरवाढीच्या विरोधात आज नाशिक इथं राष्ट्रवादी काँग्रेसनं केलं आंदोलन
July 1, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंधन दरवाढीच्या विरोधात आज नाशिक इथं राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं. पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागं घ्या अशा घोषणा देत पेट्रोल - डिझेल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचं फुल देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी आंदोलन केलं. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांना या  मागणीचे निवेदन दिलं.

वाशिम जिल्ह्यात रिसोड विधानसभा मतदार संघाचे आमदार अमित झनक यांच्या  नेतृत्वात तहसील कार्यालयावर आज मोर्चा धडकला. केंद्र सरकारनं केलेली पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ ही सर्वसामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक करणारी आहे, ती मागं घ्यावी, तसंच शेतकर्यां्ना बोगस बियाणं देऊन शेतकर्यां ची ज्या  कंपनीनं फसवणूक केली त्या बियाणे कंपनीवर त्वरित कारवाई करावी, अशा मागण्यांचं निवेदन मोर्चेकऱ्यांनी तहसीलदार अजित शेलार यांना दिलं.