उद्या मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान विशेष मेगा ब्लॉक
July 25, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई (वृत्तसंस्था) : भायखळा-सॅण्डहर्स्ट रोडला जोडणाऱ्या हॅकॉक पुलाचं काम करण्यासाठी उद्या मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान विशेष मेगा ब्लॉक असणार आहे. तर, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक असेल.

या विशेष ब्लॉक दरम्यान सीएसएमटी आणि चिंचपोकळी दरम्यानच्या मार्गांवर सकाळी 8.40 ते  दुपारी 2.10 दरम्यान वाहतूक पूर्णत: बंद राहील.