उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा
July 5, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई : गुरुपौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, “आपल्या राज्याला, देशाला गुरू-शिष्य परंपरेचा वैभवशाली वारसा लाभला आहे. राजकीय, सामाजिक जीवनात काम करत असताना आपल्यापैकी सर्वांनीच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ही परंपरा यशस्वीपणे पुढे नेली आहे. सार्वजनिक जीवनात भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण खूप काही शिकत असतो. ते देखील आपले गुरुच असतात. आपल्याला जीवनध्येय सांगणाऱ्या आणि ते गाठण्याचा मार्ग दाखवणाऱ्या सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेनिमित्त कृतज्ञतापूर्वक वंदन. आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा.”