उल्हासनगरमध्ये सिलिंडर स्फोटात एका जणाचा मृत्यू
August 8, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई (वृत्तसंस्था) : ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर मध्ये एका उपाहारगृहात आज दुपारी झालेल्या एल पी जी सिलिंडरच्या स्फोटात एक जण ठार, तर अकरा जण जखमी झाले. स्फोटामुळे लागलेल्या आगीत, मालक  जागीच ठार झाला, तर होरपळलेल्या इतरांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

त्यातल्या तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती, पोलिसांनी दिली आहे.