एच सीएनजी या इंधनाचा वापर करण्यास परवानगी
September 28, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात स्वच्छ इंधनाच्या वापराला प्रोत्सान देण्याच्या उद्देशाने पुढचे पाऊल टाकत आज रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सीएनजी इंजिनांमध्ये हायड्रोजन असणाऱ्या एच सीएनजी या इंधनाचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. या इंधनाचा वापर केल्यानंतर उत्सर्जन कमी प्रमाणात होत असल्याचा अभ्यास केल्यानंतर ही परवानगी देण्यात आली आहे.