एमजी मोटर इंडियाची ‘एमजी सेवा- पॅरेंट्स फर्स्ट’ मोहीम
August 28, 2020 • महेश आनंदा लोंढे

एमजी मोटर इंडियाने ग्राहकांच्या पालकांच्या १५०० कारचे सॅनिटायझेशन केले

मुंबई : एमजी मोटर इंडियाने नुकतीच देशव्यापी उपक्रम ‘एमजी सेवा- पॅरेंट्स फर्स्ट’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून वाहननिर्मात्याने ग्राहकांच्या पालकांच्या मालकीच्या कार सॅनिटाइज करणे सुरू केले आहे. एमजीने आतापर्यंत देशभरात १५००पेक्षा जास्त कार सॅनिटाइझ केल्या आहेत.

पालकांची कार कोणत्याही ब्रँडची असो, तिचे सॅनिटायझेशन मोफत आहे. ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित आणि सॅनिटाइझ्ड ड्रायव्हिंग अनुभव देण्यासाठी एमजीच्या देशव्यापी डिलरशिप नेटवर्ककडून हा उपक्रम राबवला जात आहे. कारचे केबिन सुरक्षित आणि संसर्गमुक्त करण्यासाठी सॅनिटायझेशन प्रक्रियेत इको-फ्रेंडली ‘ड्राय वॉश’सह सीटसारखे टच पॉइंट एरियादेखील स्वच्छता प्रक्रियेत समाविष्ट आहेत.

‘एमजी सेवा-पॅरेंट्स फर्स्ट’ मोहिमेचा उद्देश, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे आणि त्यांच्यासाठी एक संस्मरणीय अनुभव देणे, हा आहे. सॅनिटायझेशन प्रोग्राम संपूर्ण जुलै महिन्यात सुरू राहिला व तो ३१ ऑगस्ट, २०२० पर्यंत सुरू राहिल.