एमबीए आणि व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पात्रता परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश देण्यास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची परवानगी
August 24, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एमबीए आणि व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पात्रता परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश देण्यास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं परवानगी दिली आहे.

कोविड 19 साथीच्या पार्श्वभूमीवर या अभ्यासक्रमांसाठीच्या विविध प्रवेश परीक्षा घेणं शक्य नसल्यामुळे 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठीच ही सवलत दिल्याचं परिषदेनं स्पष्ट केलं आहे. प्रवेश देताना याआधी प्रवेश परीक्षा देऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.

तंत्रशिक्षण परिषदेचे सदस्य सचिव राजीव कुमार यांनी आज ही माहिती दिली.