ऑक्सफर्डनं कोरोनावरच्या लशीच्या मानवी चाचण्या घेण्यासाठी सिरम इन्स्टियुटला परवानगी
August 3, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑक्सफर्ड विद्यापीठानं विकसित केलेल्या कोविड-१९ वरच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या मानवी चाचण्या घ्यायला, DCGI अर्थात  केंद्रीय औषध नियंत्रण मंडळानं सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया ला परवानगी दिली आहे.

कोविड-१९ बाबतच्या तज्ज्ञ समितीनं केलेल्या सूचनांवर आधारित सखोल विश्लेषणा नंतर DCGI मधले डॉक्टर व्ही जी सोमाणी यांनी काल दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांसाठी परवानगी दिली, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी PTI या वृत्तसंस्थेला दिली.

ऑक्सफर्डच्या लसीच्या मानवी चाचण्या सध्या इंग्लंडमधे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात, ब्राझीलमध्ये तिसऱ्या टप्प्यात तर दक्षिण आफ्रिकेत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सुरु आहेत.