कॅग आणि महालेखापरीक्षक या संस्थेचं श्रेय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जात - उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू
July 22, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखापरीक्षक ही एक विश्वासार्ह आणि मजबूत संस्था असून त्याचं श्रेय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जात असल्याचं उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या कॅग कार्यालयाच्या आवारात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं उपराष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण झालं त्याप्रसंगी ते बोलत होते.

बाबासाहेबांच्या स्वप्नानुसार कॅग फक्त जनतेच्या पैशाच्या हिशोबाची जबाबदारी घेत नाही तर जनतेचा मित्र आणि मार्गदर्शक म्हणूनही काम करत असल्याच ते म्हणाले.