कॅप जेमिनी टेक्नॉलॉजिज् लिमिटेड कंपनीकडून महानगरपालिकेस २००० पीपीई किट्स
July 30, 2020 • महेश आनंदा लोंढे

पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीकोनातून कॅप जेमिनी टेक्नॉलॉजिज् लिमिटेड कंपनीकडून महानगरपालिकेस २००० पीपीई किट्स, ५०० नग के एन ९५ मास्क, २००० नग कवच मास्क, ५० लिटर सॅनिटायझर सुपूर्द करण्यात आले. कंपनीचे मा. केंद्र प्रमुख मनिष मेहता यांनी मा. आयुक्त श्रावण हर्डीकर यांचेकडे सदर कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाटप करण्याकरीता सुपुर्द केले.

यावेळी मा. सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, माहिती व जनसंपर्क विभागाचे मा. प्रफुल्ल पुराणिक, कंपनीचे मा. मनुष्यबळ विकास व्यवस्थापक अमित मुढाळे उपस्थित होते.