केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण
August 2, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. माझी तब्बेत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल होत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

कोरोनाची लक्षणं दिसून आल्यानंतर त्यांनी कोरोनाची चाचणी करुन घेतली. त्याच्या अहवालात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना विलगीकरणात राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. 

दरम्यान तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आल्याचं पीटीआय या वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.