कोरोना विषाणूचा संसर्ग हवेतूनही होतो
July 6, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग हवेतूनही होतो असल्याचा दावा जगभरातल्या 200 हून अधिक वैज्ञानिकांनी केला आहे.  छोट्याछोट्या कणांद्वारे याचा फैलाव होत असल्याचे पुरावे मिळाले असल्यानं यासंदर्भातल्या दिशानिर्देशांमध्ये सुधारणा करावी, अशा आशयाचं पत्र 32 देशातल्या 239 शास्त्रज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला लिहिलं आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग संक्रमित व्यक्तीची शिंक किंवा खोकला यातूनच पसरत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. 29 जून रोजी जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार वैद्यकीय प्रक्रियेतून तयार झालेल्या 5 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या थेंबांच्या माध्यमातून हवेतून या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो.