कोरोना विषाणू संसर्गावरची लस तयार करण्याच्या कामात आयसीएमआर घाई करत असल्याचा माकपचा आरोप
July 4, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गावरची लस तयार करण्याच्या कामात भारतीय वैद्यक संशोधन परिषद विनाकारण घाई करत असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने केला आहे.

पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी आज ट्वीटर वर सांगितलं की कोवॅक्सीन लशीचा प्रयोग मानवी शरीरावर लवकरात लवकर करुन येत्या 15 ऑगस्टपर्यंत लशीची चाचणी पूर्ण करण्याचे निर्देश ICMR ने विविध संस्थांना दिले आहेत.

मात्र त्या प्रयोगासाठी सुरक्षिततेची मानकं, आणि कार्यपद्धती याबाबत काहीही पारदर्शकता नाही. केवळ लस शोधून काढण्याची घोषणा स्वातंत्र्यदिनी करता यावी म्हणून ही घाई होत आहे, अशी टीका येचुरी यांनी केली.