कोविडसंदर्भात राज्यात २ लाख ८२ हजार गुन्हे दाखल; ४१ हजार व्यक्तींना अटक
October 15, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ८२ हजार ५२३ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ४१ हजार २९१ व्यक्तींना अटक करण्यात आली असून ३१ कोटी ४८ लाख ७५ हजार ४८२ रु. दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते १४ ऑक्टोबर या कालावधीत

पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३७४ (९०० व्यक्ती ताब्यात)

१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख १३ हजार ९९९

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४७

जप्त केलेली वाहने – ९६,५८३

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस –

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील २३९ पोलीस व २५ अधिकारी अशा एकूण २६४ पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला.

पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून  सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.