कोविड-१९च्या साथीमुळे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलल्या
July 4, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेईई आणि नीट परीक्षा, कोविड-19 च्या साथीमुळे केंद्र सरकारने पुढे ढकलल्या आहेत. आता जेईई मुख्य परीक्षा यावर्षी 1 ते 6 सप्टेंबर या कालावधीत तर जेईई अॅडवान्स्ड परीक्षा 27 सप्टेंबर रोजी होईल.

वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होईल. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली.