कोविड-१९ मुळे जगभरातील मृत्युंची संख्या ६ लाख ५५ हजारावर
July 29, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गामुळे जगभरात आत्तापर्यंत साडे १६ दशलक्ष लोक बाधित झाले असून कोविड-१९ मुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता ६ लाख ५५ हजार तीनशे झाली आहे. गेल्या सहा आठवड्यात जगातील कोरोनाबाधीतांच्या संख्येत दुपटीनं वाढ झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

अमेरिकेत कोरोना संसर्गग्रस्त रुग्णांची संख्या सर्वात जास्त म्हणजे सुमारे ४५ लाख  असून त्या पाठोपाठ ब्राझीलमध्ये ही संख्या सुमारे २५ आहे.