कोविड - १९ च्या ९ कोटींपेक्षा जास्त चाचण्यांचा भारताचा नवा उच्चांक
October 14, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- भारतानं आत्तापर्यंत ९ कोटींपेक्षा अधिक कोविड १९ तपासणी चाचण्या करून एक नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या २४ तासात देशात ११ लाख ४५ हजारांपेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. जानेवारीमध्ये पुण्यातील एका प्रयोगशाळेच्या माध्यमातून भारतानं चाचण्यांना सुरुवात केली होती. त्यानंतर नऊ महिन्यात देशानं हा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.