कोविड-19 च्या रुग्णाला केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळणार असल्याची बातमी खोटी - केंद्र सरकार
August 25, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 च्या रुग्णाला केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळणार असल्याची बातमी समाजमाध्यमात फिरत आहे, ती सर्वस्वी खोटी असल्याचं स्पष्टीकरण सरकारकडून करण्यात आलं आहे.

प्रत्येकी कोविड रुग्णामागे, प्रत्येक महानगरपालिकेला केंद्र सरकारकडून दीड लाख रुपये दिले जाणार आहेत, अशा आशयाची बातमी समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे, ती निराधार असून, अशी कोणतीही घोषणा केंद्र सरकारनं केली नसल्याचं पत्र सूचना कार्यालयानं कळवलं आहे.