गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात सुरू होणाऱ्या नक्षल शहीद सप्ताहाला विरोध
July 26, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातल्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या नक्षल शहीद सप्ताहाला विरोध दर्शवला आहे. गावात बॅनर लावून आणि  घोषणा देत हा विरोध करण्यात आला. नक्षलवाद्यांनी आतापर्यंत ५३४ निष्पाप नागरिकांची हत्या केली आहे.

त्यामुळे आम्ही हा बंद पाळणार नाही, असा संकल्प नागरिकांनी केला आहे. एटापल्ली तालुक्यातल्या गट्टा-जांभिया आणि हेडरी, भामरागड तालुक्यातल्या  कोठी आणि कोरची तालुक्यातल्या गरापत्ती गावातल्या नागरिकांनी हा विरोध दर्शवला आहे.

२८ जुलै ते  ३ ऑगस्ट दरम्यान हा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या  सप्ताहात नक्षलवादी ठिकठिकाणी मृत नक्षलवाद्यांची स्मारकं बांधून त्यांना श्रद्धांजली वाहतात आणि बंद पाळण्याचं आवाहन करतात.