चित्रपट निर्मात्यांनी अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांना काम देऊ नये - रामदास आठवले
September 26, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंदी सिनेसृष्टीतील अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या तसंच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून अंमली पदार्थ सेवन करतात म्हणून शिक्कामोर्तब झालेल्या कलाकारांना चित्रपट निर्मात्यांनी आपल्या चित्रपटात काम दिलं तर अशा चित्रपटांचं  चित्रीकरण आरपीआय बंद पाडेल असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.

चौकशीत स्त्री पुरुष भेदभाव नसावा याकडेही नार्कोटिक्स विभागानं लक्ष द्यावं असं आवाहन आठवले यांनी केल आहे. अभिनेत्री पायल घोष यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार सिने दिग्दर्शक अनुराग कश्यप यांना मुंबई पोलिसांनी अटक केली पाहिजे अशी मागणी आठवले यांनी केली आहे.