चिरकालीन महाकाव्य रामायणात दर्शविल्याप्रमाणे धर्माचा सार्वत्रिक संदेश प्रसारित करण्याचे उपराष्ट्रपतींचे जनतेला आवाहन
August 2, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती, श्री एम वैंकय्या नायडू यांनी चिरकालीन महाकाव्य रामायणात दर्शविल्याप्रमाणे धर्म किंवा नीतीमत्तेचा सार्वत्रिक संदेश समजून घेऊन तो प्रसारित करण्याचे आणि त्यातील समृद्ध मूलभूत मूल्यांच्या आधारे जीवन समृद्ध करण्याचे आवाहन आज नागरिकांना केले.

आज 17 भाषांमध्ये `मंदिर पुनर्निर्माण, मूल्यांची पुनर्स्थापना` या शीर्षकाच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उपराष्ट्रपती यांनी भगवान राम यांच्या अयोध्या येथील मंदिराची पुनर्बांधणी 5 ऑगस्ट रोजी होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

याला उत्सवाचा क्षण असे संबोधित, उपराष्ट्रपती म्हणाले की, रामायणाचे सार समजून घेऊन योग्य दृष्टिकोन जाणून घेतल्यास या क्षणामुळे सामाजिक अध्यात्मिक उभारी देऊ शकेल. हा कार्यक्रम आपल्याला रामायण आठविण्यास प्रवृत्त करतो, जे आपल्या सामूहिक चेतनेचा एक भाग बनलेले शाश्वत महाकाव्य आहे. भगवान राम यांना  त्यांनी एक अनुकरणीय आदर्श प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून संबोधले, ज्यांचे जीवन अनुकरणीय मूल्य, न्याय्य आणि जबाबदार सामाजिक व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाचे आहेत.

ते म्हणाले की, रामायण इतके सार्वभौमदृष्टी असलेले आहे की त्यामुळे  दक्षिण-पूर्व आशियातील अनेक देशांच्या संस्कृतीवर स्पष्ट आणि गहन प्रभाव पडला आहे. वैदिक आणि संस्कृतचे अभ्यासक, आर्थर अँथनी मॅकडोनाल्ड यांचे वचन उद्धृत करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, भारतीय ग्रंथात सांगितल्याप्रमाणे रामाच्या कल्पना मूलतः धर्मनिरपेक्ष आहेत आणि लोकांच्या जीवनावर आणि त्यांच्या विचारांवर त्यांचा प्रभाव कमीत कमी अडीच हजार वर्षांपेक्षा अधिक आहे. श्री नायडू यांनी दक्षिण पूर्व आशियातील जावा, बाली, मलाया, बर्मा, थायलंड, कंबोडिया आणि लाओस अशा अनेक देशांची यादी मांडली जिथे भगवान राम यांच्या कथेला फार मोठे सांस्कृतिक महत्त्व आहे. भौगोलिक आणि धार्मिक सीमा ओलांडून रामायणातील जगाच्या सांस्कृतिक पटलावर श्री नायडू यांनी प्रभावी प्रकाश टाकला.

बौद्ध, जैन आणि शीख यांसारख्या इतर धर्मांनी रामायण कोणत्या ना कोणत्या रुपात रुपांतर केले आहे, हे त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे.

मानवाने आत्मसात करण्याच्या उत्कृष्ट गुणांचे मूर्तीमंत रूप त्यांनी  रामाला म्हटले आहे. रामाच्या जीवनाचा अर्थ म्हणजे मूल्यांचा संच ज्यामध्ये सत्य, शांती, सहयोग, करूणा, न्याय, सर्वसमावेशकता, भक्ती, त्याग आणि सहानुभूती यांचा समावेश आहे.