जगभरात एक कोटी 19 लाख व्यक्तींना कोरोनाची बाधा
July 9, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात आतापर्यंत एक कोटी 19 लाख व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. पाच लाख 45 हजार 728 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित अमेरिकेत सुमारे 30 लाख असून, त्या पाठोपाठ ब्राझिलमध्ये 16 लाख 68 हजार, भारत सात लाख 42 हजार आणि रशिया सहा लाख 99 हजार कोरोनाबाधित आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन सेवांचे प्रमुख डॉक्टर मायकेल रायन यांच्या म्हणण्यानुसार पुरेशा चाचण्या केल्या जात असल्या, तरी साथीचा प्रभाव वाढत असल्यामुळेच रुग्णसंख्या वाढते आहे.