जम्मू- काश्मिरमध्ये चकमकीत तीन दहशतवादी ठार
September 17, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मिरमध्ये श्रीनगर शहरातील बातमालु भागात आज सकाळी सुरक्षादला बरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले.

या भागात सुरक्षा दलाकडून तपासणी केली जात असताना तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानावर हल्ला केला त्यावेळी ही चकमक झाली असं पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितलं. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.