जम्मू - काश्मीरमध्ये सैन्य दलाची दहशतवाद्यांबरोबर चकमक
September 2, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजौरी जिल्ह्यातील नौशेरा, केरी भागात आज पहाटेच्या सुमारास पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा एकदा नियंत्रण रेषेचं उल्लंघन करीत अंदाधुंद गोळीबार केला. भारतीय सैन्यानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं असून अद्याप चकमक सुरु आहे. यामध्ये पंजाब रेजिमेंटचा एक जवान शहीद झाला असल्याचं लष्करी सूत्रांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात हा जवान जखमी झाल्यानं त्याला तातडीनं लष्करी रुग्णालयात हलविण्यात आलं, मात्र तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या वर्षात १७९३ वेळा पाकिस्तानी सैन्यानं जम्मू काश्मीर भागात नियंत्रण रेषेचं उल्लंघन केलं आहे.

दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये बडगाम भागातूनही आज सकाळी सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून हत्यारं आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला असून अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे.