जय जीत सिंग दहशतवाद विरोधी विभागाचे नवे प्रमुख
October 10, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक जय जीत सिंग यांची राज्यातल्या दहशतवाद विरोधी विभागाचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. राज्य सरकारनं काल त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

१९९० च्या तुकडीतले पोलीस अधिकारी असलेले सिंग सध्या भ्रष्टाचार विरोधी विभागाचे प्रमुख म्हणूनही काम पाहात होते.राज्य सरकारनं काल आणखी काही अधिकाऱ्यांच्या नियुक्तींचीही घोषणा केली. त्यानुसार वरीष्ठ पोलीस अधिकारी प्रभात कुमार यांची भ्रष्टाचार विरोधी विभागाचे अतिरिक्त महासंचालक म्हणून, तर नवल बजाज यांची आर्थिक गुन्हे शाखेचे अतिरिक्त महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.

निकेत कौशिक यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेच्या सह पोलीसआयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या या पदावर असलेले राजवर्धन यांची महिला अत्याचारविरोधी विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे, तर संजय मोहीते यांची कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.