टाळेबंदीच्या काळातली ३०० युनिट पर्यंतची वीजबिलं सरकारनं माफ करावीत
August 10, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीमुळे व्यवसाय ठप्प झाल्यानं, टाळेबंदीच्या काळातली ३०० युनिट पर्यंतची वीजबिलं सरकारनं माफ करावीत, या मागणीसाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेनं राज्यव्यापी आंदोलन छेडलं असून बुलडाणा जिल्ह्यात   ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी षण्मुखाराजन एस. यांच्याशी चर्चा करून त्यांनी आपली मागण्यांबाबतचं  निवेदन दिलं.