ट्रायनं व्होडाफोन- आयडियाला बजावली कारणे दाखवा नोटीस
August 26, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्होडाफोन- आयडियानं जलद 4-जी नेटवर्क आणि जलद इंटरनेट या बाबत घोषीत केलेल्या नवीन योजनांमधे पारदर्शिता नसल्यानं त्या वादग्रस्त आहेत, असं म्हणत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात, ट्रायनं व्होडाफोन- आयडियाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

मात्र, भारती एअरटेलच्या योजनांमधे पारदर्शिता असल्यानं त्यांना नोटीस बजावण्याची गरज नसल्याचं ट्रायचं म्हणणं आहे.