डोनाल्ड ट्रम्प यांची पक्षाचे अध्यक्षीय निवडणुकीसाठीचे उमेदवार म्हणून निवड
August 25, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेत काल देशाचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पक्षाचे अध्यक्षीय निवडणुकीसाठीचे उमेदवार म्हणून अधिकृत निवड करण्यात आली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही परिषद दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाली.

अमेरिकेत ३ नोव्हेंबरला अध्यक्षीय निवडणूक होणार आहे. ट्रम्प यांच्यासमोर डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांचे आव्हान आहे. ट्रम्प हे २७ तारखेला, म्हणजे गुरुवारी उमेदवारी स्वीकृतीचे भाषण करणार आहेत.