दूध आंदोलनात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करावा अशी किसान सभेची मागणी
August 13, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई (वृत्तसंस्था) : दुधाला प्रतिलिटर किमान 30 रुपये दर मिळावा यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि किसान सभेनं केली आहे. 

टाळेबंदीच्या काळात दुधाची मागणी कमी झाल्याचं कारण देत दूध संघ आणि कंपन्यांनी दुधाचे खरेदीचे भाव 10  ते 12 रुपयांनी कमी केले आहेत. दूधाच्या विक्री दरात मात्र केवळ 2 रुपयांची कपात केल्यानं ग्राहक आणि शेतकऱ्यांची लूट होत आहे. त्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे.