देशांतर्गत प्रवास करणे सुरक्षित होईपर्यंत रणजी करंडकांचे सामने शक्य नसल्याचं सौरव गांगुली यांचं स्पष्टीकरण
July 9, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशांतर्गत प्रवास करणे सुरक्षित होईपर्यंत रणजी करंडकाचे सामने सुरू होऊ शकणार नाही असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्ट केलं आहे.

कोरोना महामारी मुळे यंदाच्या बऱ्याच स्पर्धा रद्द कराव्या लागल्या आहेत. २०२०-२१ या मोसमाची सुरुवात ऑगस्टच्या शेवटी  विजय हजारे करंडकने होईल अशी शक्यता आहे. त्या नंतर दुलीप ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली करंडकाचं आयोजन प्रस्तावित आहे.