देशातल्या महानगरांमध्ये कोरोनाबाधितांकडून इतरांना कोरोनाची लागण होण्याच्या प्रमाणात घट
August 3, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या महानगरांमध्ये कोरोनाबाधितांकडून इतरांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण कमी झालं आहे. याठिकाणी एका कोरोनाबाधितामुळं सरासरी एकापेक्षा कमी व्यक्तीला कोरोनाची लागण होत असल्याचं दिसून येतं आहे.

गणितीय भाषेत याला रिप्रोडक्टिव्ह व्हॅल्यू अर्थात आर व्हॅल्यू असं म्हणतात. सध्या मुंबईची आर व्हॅल्यू ० पूर्णांक ८१ शतांश, दिल्लीची ० पूर्णांक ६६ तर चेन्नईची ० पूर्णांक ८६ टक्के इतकी आहे. आत्ताची राष्ट्रीय आर व्हॅल्यू १ पूर्णांक १६ शतांश टक्के असून देशात आंध्र प्रदेशाची आर व्हॅल्यू सर्वात जास्त १ पूर्णांक ४८ टक्के इतकी आहे.

आर व्हॅल्यू एकापेक्षा कमी असणं है कोरोनाची साथ आटोक्यात आल्याचं दर्शवत असल्याचं मत कोलकत्याच्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे भौतिक शास्त्राचे प्राध्यापक दिव्येंदु नंदी यांनी व्यक्त केलं.