देशात कोविड १९चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७७ पूर्णांक १५ शतांश टक्के
September 4, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७७ पूर्णांक १५ शतांश टक्के असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. काल देशभरात ८३ हजार ३४१ कोरोनाबाधित आढळले असून एकूण रुग्ण संख्या ३९ लाख ३६ हजार ७४७ झाली आहे.

देशातला मृत्यूदर १ पूर्णांक ७४ शतांश टक्के झाला आहे. आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या तुलनेत सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची टक्केवारी २१ पूर्णांक ११ शतांश असल्याची माहितीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

या संसर्गासाठी कालपर्यंत चार कोटी ६६ लाख ७९ हजार १४५ नमुने तपासण्यात आले असून यातल्या अकरा लाख ६९ हजार ७६५ चाचण्या काल करण्यात आल्या आहेत.