नवनियुक्त मुख्य सचिवांनी घेतली राज्यपालांची भेट
July 1, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई : राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी आज (दि.1) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

मुख्य सचिव पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर संजय कुमार यांची ही राज्यपालांसोबतची पहिलीच भेट होती.